अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Foto
वैजापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मुंबई - नागपूर हायव्हेवर शिवराई रोडवर साई विश्वा हाँटेल जवळ घडली. उमेश गायकवाड असे मृत्यू झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादहून दुचाकीस्वार  क्र एम २० ऐ डब्लू ४९२८ वरून उमेश गायकवाड व विजू पाडळी हे शिर्डीकडे जात असताना वैजापूर कडून औरंगाबाद कडे येणार्‍या चारचाकी अज्ञात वाहने समोरून धडक दिली.या धडकेत उमेश गायकवाड जागीच ठार झाला.तर त्याच्यासोबत असणारा विजू पाडळी (वय २४) हा जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पीएसआय राठोड ,हे. का शेख राहुल, थोरात तमनार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस वैजापूर ग्रामीण उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.याबाबत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker